Wednesday, May 5, 2021

प्रत्येक घरात एकच आवाज कोरोना विरुद्ध लढायचं आज..

प्रत्येक घरात एकच आवाज 
कोरोना विरुद्ध लढायचं आज,
कोरोना संपायला हवा आज.

कोरोनाचा इथ काय टिकाव लागणार 
जिथ डॉक्टर, पोलिस आणि कर्मचारी आहेत
आपल्या रक्षणासाठी  तैनात, 
कोरोना संपवण्यासाठी रात्रंदिवस 
प्रयत्न करत आहेत अफाट. .

लक्षात राहणार आहेत ते लोकं,
जे देशावर संकट आल्यावर आलेत धावून.
स्वतःचा जिवाची परवा न करता,
देश वाचवण्यासाठी लढत आहेत मैदानात येऊन .

सगळ्यांना समजले आहेत खरे हीरो 
त्याच्या पुढे टीवी चित्रपट आहेत ज़ीरो,
हे कोणी सोशल मीडियावर नाहीत हवा करणारे 
हे कोणी खूप पैसे कमवून नाहीत माज दाखवणारे ,
हे ते आहेत ज्यांना काही लोकांनी नाही दिली इज्जत 
केल होत नजर अंदाज, 
हे तेच आहेत जे कित्येक महिने झाले नाही गेले घरी 
साथ देऊ आपण त्यांना , राहुन आपल्या घरी.

गर्व वाटतो आम्हाला तुमच्यावर 
सलाम आहे तुमच्या या कामावर.

                          -✍️मिथिलेश संजय गायकवाड 

1 comment:

शिवाजी कोण होता?’ - एक विचारप्रवर्तक पुस्तक

शिवाजी कोण होता ?  या पुस्तकाची पहीली आवृत्ती एप्रिल १९८८ मध्ये ३००० प्रतीची निघाली होती आणि इतक्या उशिरा हे पुस्तक मी वाचलं यां...