Monday, May 31, 2021

प्लास्टिक प्रदुषण - एक जागतिक समस्या व त्यावर उपाय

मित्रांनो सध्याची परिस्थिती पाहायला गेल तर देशात कोरोनाने थैमान घातले आहे,कोरोना वाढण्याचे प्रमाण काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये शहर तसेच ग्रामीण भागात हाहाकार घातलाय, लवकरच आपण संकटमुक्त व्हावं हिच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. 
         या संकटातून मुक्त झाल्यावर जरा आपण निसर्गासाठी काहीतरी करू थोडा पर्यावरण अभ्यास करायला हवा,पर्यावरण संशोधकांचामते जर मनुष्याने पर्यावरनाकडे दुर्लक्ष केले तर पुढील काही वर्षानंतर आपल्यावर मोठ संकट येउ शकते ,निसर्गाचा नियमच आहे, जे पेराल तेच उगवेल. आपण निसर्गाला हानी पोहोचवत असु तर परतफेड तर होणारच . पाहायला गेल तर आपल्याकडे विज्ञान साक्षरता कमीच आहे, पाण्याची बाटली पुन्हा वापरू नये असे त्यावर लिहलेले असून सुद्धा आपण त्याकडे लक्ष न देता पुन्हा पुन्हा वापर करतो ,खाद्यपदार्थाची पाकिटे, प्लास्टिकची पिशवी ,पाण्याच्या बोटल्स वापरून झाल्यानंतर जागा मिळेल तिथे फेकल्या जातात. मानवाने न गंजणारी वजनाने हलकी आणि टिकाऊ वस्तू हा पदार्थ बनवला खरा पण तो टाकाऊ झाल्यानंतर नष्ट हि करता येत नाही, त्यामुळे प्रदुषण होते. परत वापरात न आणता येणारे प्लास्टिकचे पदार्थ टाकायचे कुठे त्याची विल्हेवाट लावायची कशी ही समस्या आज जगापुढे आहे. जागतिक पातळीवर पहायला गेले तर दरवर्षाला 330 दशलक्ष टनांपेक्षा अधिक प्लास्टिकची निर्मिती होत आहे. हा वेग लक्षात घेता 30/35 वर्षांपर्यंत प्लास्टिकची निर्मिती तिपटीने होइल म्हणजेच सुमारे एक हजार दशलक्ष टन वाढण्याचा अंदाज संशोधक व्यक्त करत आहेत, आपण भारतात तयार होणाऱ्या प्लास्टिकचा विचार केला तर 1.2 कोटी चा आसपास प्लास्टिक उद्योग भारतात आहेत काही हजार लहान मोठ्या कंपन्या तर सर्वसाधारण पणे एका भारतीयाचा वर्षभरात 11 किलो प्लास्टिकचा वापर होतो. अगदी आपण खात असलेल्या अन्न पदार्थांपासून ते वापरात असलेल्या कपड्यांवरही प्लास्टिकने आपली छाप सोडली आहे. मानवी आरोग्याचा विचार केला तर वेगवेगळ्या माध्यमांद्वारे एका आठवड्यात सुमारे 2 हजार प्लास्टिकचे कण शरीरात जातात.आता हे कण कसले विचार आला असेलच, आपण बिस्किट फोडून,दूध पिशवी कट केल्यावर किंवा काही लोक सिगरेट ओढतात त्याचे तुकडे किंवा अजून वेफर्स वगैरे त्यातला एक छोटा भाग आपण कुठेही फेकतो असेच काही लहान लहान तुकडे नकळत पोटात जातात, एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक शरीरात जात असेल, तर शरीर त्यास कसे प्रत्युत्तर देईल याची कल्पना न केलेलीच बरी. 
           भारतात दररोज लाखो  पाण्याचा बाटल्या पाणी पिऊन फेकल्या जातात, भरपूर प्रमाणात छोटी पाकिटे जागा मिळेल तिथे फेकतात त्याच काय होत असेल, तर ते आहे त्या अवस्थेत पडून राहतात बर हे झाले आपल्या देशातील आता देशात प्लास्टिक तयार होतय ते आहेच पण बाहेरच्या देशांमधून प्लास्टिक येत ते वेगळ, प्लास्टिक स्वस्त आहे त्यामुळे लोक जास्त वापर करतात, म्हणजे भारतात प्लास्टिक तयार होत ते इथुन जास्त बाहेर पण नाही जात याउलट बाहेरच्या देशांमधून प्लास्टिक आयात होतय ते वेगळच, खुप भयानक आहे ना हे. मानवाने प्लास्टिकचा वापर खरच कमी करायला हवा ना.  
           हिच वेळ आहे आपल्याकडे तर मग आपण स्वतः पासूनच सुरुवात करायला हवी, जसे कोरोना काळात आपण घरीच मास्क शिवले आणि वापरले तसेच आपण कापडी पिशवी शिवली आणि तीच वापरली तर प्लास्टिक पिशवीची गरज लागणार नाही, आपण बाहेर काही चॉकलेट, बिस्किटे खातो त्याचे पाकिटे जर आपण इथे तिथे न फेकता घरी येऊन कचर्‍याचा डब्यात टाकले तरी चालेल ते नकळत पुढे प्राणी पक्षांच्या पोटात जाण्यापासून थांबेल, आपण बिस्लरीची बाटली वापरून झाल्यानंतर ती कापून त्यात छोट झाड लावू शकतो किंवा फिरायला गेल्यावर एखाद्या झाडावर लावली तर उन्हाळ्यात पक्षांना पिण्यासाठी पाणी ठेवू शकतो, पुढे हे प्लास्टिक ओढ्याद्वारे, गटराद्वारे नदीमधे जाण्यापासून थांबेल.
       आपण स्वतःच्या शहरातून एक फेरफटका मारला तर जागोजागी प्लास्टिक पिशव्या,छोटी पाकिटे, वापरून टाकलेले पेन, गुटख्याची पाकीट यांचा ढीग दिसतो जर आपण आपल्या मित्रमैत्रिणी सोबत हे सगळ दर महिन्याला गोळा करून पुनर्वापरसाठी कंपनी मधे पाठवण्यास मदत केली आणि लोकांना अशी घाण करण्यापासून थांबवण्यासाठी प्रयत्न केला तर नक्कीच आपण आपल शहर स्वछ करु शकतो प्लास्टिकचा घाणीपासून मुक्त होण्यास  स्वतः आणि स्वतः चा शहरापासून सुरुवात करु शकतो.हिच सुरुवात एक दिवस जगात नक्कीच बदल घडवून आणू शकतो,चला तर मग आपण आपल्यापासून सुरुवात करू.
                                
                                 -✍️मिथिलेश संजय गायकवाड.

3 comments:

शिवाजी कोण होता?’ - एक विचारप्रवर्तक पुस्तक

शिवाजी कोण होता ?  या पुस्तकाची पहीली आवृत्ती एप्रिल १९८८ मध्ये ३००० प्रतीची निघाली होती आणि इतक्या उशिरा हे पुस्तक मी वाचलं यां...