मी निघालो शोधण्यास स्वतः ला
कोण आहे मी कळेल का मला...
मी या जगात आलोय कशासाठी
सापडेल का ते मला,
हजारो लोकांमध्ये स्वतः च वेगळेपण
सिद्ध करता येईल का मला..?
मनात अनेक प्रश्न आहेत
त्यांची उत्तरे मला सापडणार का,
आयुष्य जगण्याचा नवा अर्थ
मला समजणार का ..?
मार्ग अनेक आहेत पण
जगण्याचा मार्ग सापडेल का मला,
स्वप्नांच्या समुद्रात खोलवर उडी घेतली
तर पोहता येईल का मला ...?
दिवस आणि रात्र दोघेही एकत्र
येऊन प्रकाश द्यायला येतील का मला,
अशक्य हे शक्य करून
मी हि शोधणार आहेच स्वतःला .
- ✍️मिथिलेश गायकवाड.
������
ReplyDeleteनक्कीच खुप मोठा माणूस होणार तू एकदिवस.
ReplyDeleteलिहीत रहा 👌👌👏
सुपर...
ReplyDelete